अंबाडीची भाजी
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१० अंबाडीच्या जुडीतल्या काड्या (इथे भारी मोठा गठ्ठा मिळतो इं ग्रो मधे) चिरल्यावर साधारण २ वाट्या
१/२ वाटी तांदुळ,
५,६ लसूण पाकळ्या,
३,४ लाल मिरच्या
क्रमवार पाककृती:
अंबाडीची पाने खुडुन घ्यावीत. व्यवस्थित धुवुन बारिक चिरावीत.
१ वाटी तांदुळ घेउन ते धुवावेत त्यात २.५ वाट्या पाणी टाकुन वर चिरलेली आंबाडी टाकावी
भांडं कुकरला लावावं. भाताबरोबरच अंबाडी मस्त शिजते.
कुकर झाल्यावर भात व अंबाडी नीट घोटुन घ्यावी. लसूण ठेचुन घ्यावा.
कढईत मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करुन लसूण टाकवा. लसूण थोडा लाल झाला की मिरच्या टाकाव्यात, थोडं तिखट टाकावं. घोटलेल भात, अंबाडीचं मिश्रण टाकावं. चवीनुसार मीठ टाकुन चांगलं परतुन एक वाफ द्यावी.
भाजी भाकरी किंवा पोळीबरोबर चापावी. माझी लेक तर नुसतीच खाते.
Flax vegetable
ML/ML/PGB
17 July 2024