एक लाखांची लाच घेताना कार्यकारी अभियंता अटकेत

वर्धा, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वर्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश बुब यांनी वृक्षारोपण केलेल्या कामाचे पैसे काढून देण्यासाठी १ लाख रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभाग वर्धा यांनी रंगेहाथ पकडून अटक केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक खंडेराव यांनी दिलेल्या माहितीनुसार बिल काढून देण्यासाठी ५ टक्क्यांची मागणी करण्यात येत होती. मात्र वृक्षारोपण कामाचे बिल काढून देण्यासाठी तक्रारदारासोबत अडीच टक्के बोली झाली. कंत्राटदाराने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्याप्रमाणे काल प्रकाश बुब यांच्या शासकीय निवास्थानी व्यवहार करण्याचे ठरवले.
तक्रारदाराकडून १ लाख घेतांना वर्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश बुब यांना ताब्यात घेण्यात आले. प्रकाश बुब यांच्या निवासस्थानी झडती घेतली असता ६ लाख ४० हजार रुपये आढळून आले. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वर्धा करीत आहे.
ML/KA/PGB
7 Apr. 2023