आरोग्य दिना निमित्त ‘सुंदर माझा दवाखाना’ संकल्पना…

 आरोग्य दिना निमित्त ‘सुंदर माझा दवाखाना’ संकल्पना…

वाशीम, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जागतिक आरोग्य दिना निमित्त आरोग्य विभागाच्या वतीने एक आठवडा ‘सुंदर माझा दवाखाना ही संकल्पना राबविण्यात येत असून, त्यादृष्टीने जनतेला उत्कृष्ट आरोग्य सुविधा देण्यासाठी वाशीम मधील मंगळूरपीर येथील ग्रामीण रुग्णालय सज्ज झाले आहे.

आजच्या जागतिक आरोग्य दिना निमित्त जास्तीत जास्त नागरिकांनी शासकीय आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा याकरीता आरोग्य विभागाच्या वतीने ‘सुंदर माझा दवाखाना ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यात उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय ते जिल्हा रुग्णालयापर्यंत सर्व संस्था सहभागी होत आहेत.

या उपक्रमाची सुरुवात ७ एप्रिलपासून होऊन पुढील एक आठवडा हा उपक्रम सुरू राहणार आहे. आरोग्य संस्था ह्या स्वच्छ आणि प्रसन्न दिसाव्यात यासाठी आरोग्य संस्थांची आंतरबाह्य स्वच्छता करण्यात केली आहे.

प्रत्येक रुग्णालयाच्या नावाचे सुस्पष्ट फलक दर्शनी भागात लावण्यात आले असून रुग्णालयातील स्वच्छतागृहे प्राधान्याने स्वच्छ करण्यात आली आहेत.सुंदर माझा दवाखाना ही संकल्पना यशस्वी करण्या करीता आरोग्य विभागाच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात येत आहेत.On the occasion of Health Day, the concept of ‘Sunder Maja Dawakhana’…

ML/KA/PGB
6 Apr. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *