पहिल्या ‘हिंदयान’ सायकल स्पर्धकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतातील सर्वात मोठी ‘हिंदयान’ सायकल स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्ली – पुणे अशी यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या संरक्षण दलातील अधिकारी आणि जवानांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे पदक तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
‘हिंदयान फाउंडेशन’ तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
भारतामध्ये देशव्यापी सायकल स्पर्धा होत नसून या दृष्टीने ‘हिंदयान’ने सुरु केलेला उपक्रम स्तुत्य आहे असे सांगून राज्यपालांनी सर्व स्पर्धक व आयोजकांचे अभिनंदन केले.
यावेळी हिंदयान फाउंडेशनचे संस्थापक व सायकल स्पर्धेचे प्रवर्तक विष्णुदास चापके, अतिरिक्त पोलीस महासंचालक रविंदर सिंघल, कर्नल विमल सेठी, ले. कर्नल. एस. चौधरी, कॅप्टन जयशंकर व एमसीपीओ ऋषी कुमार,विष्णूदास यांचे आई वडील,बहीण,यांच्यासह हिंदयान टीमचे रमाकांत कापसे,सुदर्शन चापके,
कांचन नेवल,भक्ती नेवल हे उपस्थित होते.
ML/KA/SL
7 April 2023