खान्देश कुलस्वामिनी एकविरा देवीचा चैत्रोत्सव

 खान्देश कुलस्वामिनी एकविरा देवीचा चैत्रोत्सव

धुळे, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खान्देश कुलस्वामिनी तसेच पाचवे शक्तिपीठ म्हणून ओळखले जाणारे आदिशक्ती श्री एकवीरा देवी यात्रोत्सवास आई एकवीरा देवीच्या रथयात्रेने प्रारंभ झाला.

देवपुरात असलेल्या एकविरा देवी मंदिरापासून या रथयात्रेची सुरुवात झाली. यावेळी आमदार मंजुळा गावित ,माजी महापौर जयश्री अहिरराव ,कमलाकर अहिरराव यासह मुख्य ट्रस्टी सोमनाथ गुरव ,चंद्रशेखर गुरव उपस्थित होते. या रथयात्रेला भाविकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

अनेक कुळांची कुलदेवता असलेल्या श्री एकवीरा देवी यात्रोत्सवास चैत्र पौर्णिमेपासून प्रारंभ
होतो. त्याआधी चतुदर्शीच्या अर्थात चावदसच्या दिवशी नवसपूर्ती, शेंडी, जाऊळ, मानतांच्या
कार्यक्रमासाठी अनेक भाविकांनी हजेरी लावली.

श्री एकवीरा देवीचा रथ मंदिरापासून सुरुवात होऊन निघूनआग्रा रोड, मोठा पूल, नगरपट्टी, ग.नं. ६, नवभारत चौक, माधवपूरा, ग.नं. ५ ,घड्याळवाली मस्जिद, राजकमल टॉकीज, आग्रा रोड येथून पुन्हा
मंदिर आवारात रथ मिरवणूकीचा समारोप झाला. या रथयात्रेत अबालवृध्द व महिला पारंपारीक वेषात तसेच भगवे फेटे धारण करून सहभागी झाल्या.

परंपरेनुसार महिनाभर चालणाऱ्या या यात्रोत्सवाची जय्यत तयारी एकविरा देवी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त
सोमनाथ गुरव यांच्यासह पोलीस प्रशासनाने पूर्ण केली आहे.

ML/KA/SL

7 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *