बीबीसी इंडियाविरुद्ध ईडीने दाखल केला गुन्हा

 बीबीसी इंडियाविरुद्ध ईडीने दाखल केला गुन्हा

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतील माध्यम विश्वात हळूहळू आपले स्थान निर्माण करू लागलेल्या बीबीसी इंडीयावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेऊन गुन्हा दाखल केला आहे. इंग्लंडमध्ये मुख्यालय असलेल्या बीबीसी या जगप्रसिद्ध ब्रॉडकास्टर कंपनीच्या भारतातील शाखेला सरकारी यंत्रणाच्या तपासाला तोंड देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

फेब्रुवारीमध्ये, आयकर अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीचा भाग म्हणून भारतातील बीबीसी कार्यालयांची झडती घेण्यात आली होती. आयकर अधिकाऱ्यांनी सांगितले की, बीबीसीच्या लेखा परिक्षणामध्ये अनियमितता दिसून येत आहे. बीबीसी समूहाने परदेशी संस्थांद्वारे भारतातील उत्पन्नावर कर भरला गेला आहे कि नाही याचीही तपासणी होईल असे निवेदनात म्हटले आहे.

ईडीने बीबीसीकडून फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्टनुसार कागदपत्रे आणि कंपनीच्या काही अधिकाऱ्यांचे स्टेटमेंट रेकॉर्डिंग मागवले आहे. तसेच एफडीआयच्या उल्लंघनसंदर्भात बीबीसीची चौकशीही होणार आहे. FEMA हा परकीय चलन व्यवस्थापन कायदा आहे जो परकीय चलनाचा प्रवाहावर नियंत्रित ठेवतो.

बीबीसीने गुजरात दंगलीवर आधारीत इंडिया : द मोदी क्वेश्चन या माहितीपट तयार करून प्रदर्शित केला होता. त्यानंतर बीबीसी मराठी वादात सापडली आहे.

SL/KA/SL

13 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *