अखेर अतिक अहमदच्या मुलाचे एन्काऊंटर

 अखेर अतिक अहमदच्या मुलाचे एन्काऊंटर

लखनऊ, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेशातील गँगस्टर राजकारणी अतिक अहमद याचा मुलगा असद आणि शार्पशुटर गुलाम हे आज उत्तर प्रदेश पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाले. या दोघांकडूनही परदेशी बनावटीची पिस्तुलं जप्त करण्यात आली आहेत.गत काही दिवसांपासून उमेश पाल हत्याप्रकरणात पोलीस या दोघांच्या मागावर होते. या दोघांना पकडण्यासाठी ५ लाखांचे इनामही जाहीर करण्यात आले होते.

आज सकाळी असद आणि गुमाम हे दोघं झाशीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई केली. उत्तर प्रदेश पोलिसांकडून असदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतर असदचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात येईल.

२००५ मध्ये उत्तर प्रदेशातील बसपा आमदार राजू पाल यांची हत्या झाली होती. याप्रकरणात उमेश पाल हे प्रमुख साक्षीदार होते. गेल्याच महिन्यात २००७ च्या उमेश पाल अपहरण प्रकरणात अतिक अहमद आणि आणखी दोघांना न्यायालयाने दोषी ठरवले होते. आज अतिक अहमद याला न्यायालयीन सुनावणीसाठी प्रयागराजला आणण्यात आले. यावेळी अतिकला आपला मुलगा पोलिसांसोबतच्या चकमकीत ठार झाल्याचे कळाले. ही बातमी कानावर पडताच अतिकला कोर्टातच रडू कोसळले. आजच्या न्यायालयीन सुनावणीसाठी अतिकला गुजरातच्या साबरमती कारागृहातून प्रयागराजला आणण्यात आले आहे.
दरम्यान राज्यात कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी आणि सामान्य लोकांना सुरक्षित वाटावे, यादृष्टीने ही कारवाई आवश्यक असल्याचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटले.भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून उत्तर प्रदेश पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक करण्यात आले आहे.

SL/KA/SL

13 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *