आता आयकर विवरणपत्रात क्रिप्टोकरन्सीसाठी स्वतंत्र रकाना
नवी दिल्ली, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुढील वर्षाच्या आयकर विवरणपत्र (ITR) अर्जामध्ये क्रिप्टोकरन्सीसाठी (cryptocurrency) स्वतंत्र रकाना असणार आहे. महसूल सचिव तरुण बजाज यांनी सांगितले की, यामध्ये करदात्यांना क्रिप्टोकरन्सीमधून झालेल्या उत्पन्नाचा (income) तपशील द्यावा लागेल. वित्त विधेयकातील ही तरतूद डिजिटल मालमत्तेवरील कराशी संबंधित आहे.
तथापि, याद्वारे क्रिप्टोच्या कायदेशीरतेबद्दल कोणतेही मत व्यक्त करण्यात आलेले नाही. यासंदर्भात संसदेत विधेयक मांडल्यानंतरच स्थिती स्पष्ट होईल. ते म्हणाले की, क्रिप्टोमधून (cryptocurrency) होणार्या 50 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर (income) 30 टक्के कराव्यतिरिक्त 15 टक्के उपकर आणि अधिभार भरावा लागेल.
त्याआधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान क्रिप्टो उत्पन्नावर (income) 30 टक्के कर लावण्यासह अनेक निर्णय घेतले होते. बुधवारी या विषयावर बोलताना वित्त सचिव टीव्ही सोमनाथन म्हणाले की खासगी क्रिप्टोमध्ये (cryptocurrency) गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की त्यात सरकारी प्राधिकरण नाही. तुमची गुंतवणूक यशस्वी होईल की नाही याची शाश्वती नसते. यात झालेल्या नुकसानीला सरकार अजिबात जबाबदार नाही.
डिजिटल चलनाला रिझर्व्ह बँकेद्वारे पाठबळ दिले जाईल जे कधीही डीफॉल्ट होणार नाही. पैसे रिझर्व्ह बँकेचे असतील पण स्वरूप डिजिटल असेल. रिझर्व्ह बँकेने जारी केलेला डिजिटल रुपया कायदेशीर असेल. उर्वरित काहीही कायदेशीर नाही आणि कधीही कायदेशीर होणार नाही. इथरियमचे खरे मूल्य कोणालाच माहीत नाही. त्याच्या दरात दररोज चढ-उतार होत असते. सरकारचे नवीन धोरण असे आहे की क्रिप्टोद्वारे कमाई करणाऱ्यांना आता 30 टक्के कर भरावा लागेल.
There will be a separate column for cryptocurrency in next year’s income tax return (ITR) application. Revenue Secretary Tarun Bajaj said that this would require taxpayers to provide details of their income from cryptocurrency. This provision in the Finance Bill deals with the tax on digital property.
PL/KA/PL/3 FEB 2022