199 बोगस कंपन्या तयार करणा-याला अटक

 199 बोगस कंपन्या तयार करणा-याला अटक

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): करचुकवेगिरी करणा-या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधातील प्रयत्नांना राज्य वस्तू व सेवा कर विभागाला मोठे यश मिळाल्याने सामान्य नागरीकांच्या पॅन व आधार कार्डाद्वारे 119 खोट्या कंपन्या तयार करणाऱ्या मयूर नागपाल या म्होरक्याला 30 मार्च रोजी जयपुर येथून अटक करण्यात आली.Creator of 199 bogus companies arrested
नागपाल हा बेनामी पद्धतीने ई-मेल तयार करत असल्याचे तपासत आढळून आले आहे.
अशा प्रकारे तयार केलेल्या खोट्या कंपन्यांची संख्या पुढील तपासात वाढण्याची शक्यता आहे अशी माहिती जीएसटीचे सहायक आयुक्त डॉ.ऋषिकेश वाघ यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
में.माही एंटरप्रायजेस या कंपनीच्या भिवंडी आणि नाशिक येथील पत्यावर छापे टाकण्यात आले.सदर कंपनी अस्तित्वात नसल्याचे आढळुन आले. या कंपनीने जवळपास 22 कोटीच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा घेतल्याचे दिसून आले. त्याच बरोबर मेसर्स माही एंटरप्रायजेस आणि या कंपनी सोबत व्यवहार दाखविणा ऱ्या कंपन्या यांच्या ई-मेल व मोबाईल नंबर मध्ये काही सामाईक दुवे सापडले. याप्रकरणी सायबर फॉरेन्सिक तज्ञांची मदत घेण्यात आली. पुढील तपासासाठी अधिका-यांचे एक पथक दिल्ली व नोएडाला जाऊन आले राष्ट्रीयकृत बँका, यूपीआय गेटवे UPI gateway. आणि दुरसंचार सेवा देणा-या संस्थांकडून माहिती गोळा करण्यात आली.

राज्य कर उपायुक्त, सहायक आयुक्त आणि राज्यकर निरीक्षकांच्या विशेष पथकाने जयपुर पोलिसांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत असता,तो जयपुर मधल्या एका बंगल्यातल्या तळघरातून आपले कामकाज करत असताना ,त्याला ताब्यात घेतले गेले. त्याचा जबाब नोंदविण्यात आला.

बेनामी ईमेल आणि खोट्या कंपन्यांशी, त्याचा थेट संबंध दिसुन आल्याने महाराष्ट्र राज्य वस्तु व सेवा कर कायद्याच्या कलम 132 अन्वये गुन्हा केल्याने त्यास अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता मुंबई अतिरीक्त महानगर दंडाधिकारी यांनी त्यास 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाचा तपास, अन्वेषण व विभागाच्या प्रमुख व राज्यकर सहआयुक्त वान्मथी सी.(भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्यकर उपायुक्त रुपाली बारकुंड यांच्या प्रत्यक्ष सहभाग व देखरेखीखाली करण्यात आला. तपास अधिकारी व सहायक राज्यकर आयुक्त डॉ. ऋषिकेश वाघ या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे. सर्व सहायक आयुक्त दिपक दांगट, रामचंद्र मेश्राम व सुजीत पाटील यांनी तपासात सहाय्य केले. अन्वेषण शाखेच्या राज्यकर निरीक्षकांनी यात मोठे योगदान दिले.
आर्थिक वर्ष 2022- 23 मध्ये राज्य वस्तू व सेवा कर विभागाने केलेली ही 73 वी अटक आहे.हे प्रकरण महाराष्ट्र शासन तसेच उत्तर प्रदेश व राजस्थान शासनाच्या यंत्रणांशी यशस्वीपणे समन्वय साधुन तडीस नेले गेले. यातील लाभलेले यश हे एक राष्ट्र एक कर कर बाजार या कल्पनेचे उत्तम उदाहरण आहे.असे पुढे डॉ. ऋषिकेश वाघ म्हणाले.

ML/KA/PGB
3 Apr. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *