सूरत पाकिस्तानात आहे का?

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काँग्रेस नेते राहुल गांधी न्यायालयीन कामासाठी सुरतमध्ये आले होते पण सूरत शहर व आपसासच्या परिसात भाजपा सरकारने जुलूम व अत्याचार केले. सुरत शहरात कोणीही येऊ नये साठी पोलीस काँग्रेस कार्यकर्त्यांची बेकायदेशीरपणे धरपकड करत होते. गुजरात पोलिसांनी अडवणूक करुन दंडेलशाही केली, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले केला आहे.Is Surat in Pakistan?
यासंदर्भात माहिती देताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रातून सूरतला जाणाऱ्यांना सीमेवर अडवण्यात आले. सुरतमध्ये येण्यास पोलीसांची मनाई होती. सूरत व परिसरात कर्फ्युसारखी परिस्थिती दिसत होती. अनेक कार्यकर्त्यांचे फोन जप्त करण्यात आले. आय. डी. कार्ड जप्त करण्यात आले. व्हिडिओ रेकॉर्डिंगही करु दिले नाही. सुरत भारतात आहे का पाकिस्तानात असे चित्र दिसत होते. हा प्रकार लोकशाही संपुष्टात आणण्याचा आहे.
ML/KA/PGB
3 Apr. 2023