व्यापक लसीकरणाचा भारताच्या अर्थव्यवस्थेला फायदा – आशियाई विकास बँक

 व्यापक लसीकरणाचा भारताच्या अर्थव्यवस्थेला फायदा – आशियाई विकास बँक

नवी दिल्ली, दि.30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात कोविड-19 च्या (covid-19) दुसर्‍या लाटेचा कहर सुरूच आहे. यादरम्यान, आशियाई विकास बँकेने (ADB) देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल (Indian Economy) चांगली बातमी दिली आहे. आशियाई विकास बँकेने म्हटले आहे की देशात चांगले आणि व्यापक प्रमाणात लसीकरण (corona vaccination) सुरू आहे. यामुळे, चालू आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था 11 टक्क्यांच्या दराने वाढू शकते. मात्र कोविडच्या रुग्णांमध्ये अलिकडेच झालेली मोठी वाढ देशातील आर्थिक सुधारणांसाठी धोकादायक ठरू शकते असे आशियाई विकास बँकेने म्हटले आहे.

लसीकरणाचा फायदा होईल
Vaccination will benefit Indian Economy

आशियाई विकास बँकेने (ADB) आपला मुख्य आशियाई डेव्हलपमेंट आउटलुक (एडीओ) 2021 अहवाल जाहीर करताना सांगितले की, चांगले लसीकरण केल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) आर्थिक वर्ष 2021 मध्ये 11 टक्यांच्या दराने वाढेल. आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 7 टक्क्यांच्या दराने वाढेल असे अहवालात म्हटले आहे. अहवालात म्हटले आहे की दक्षिण आशियातील सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) यावर्षी 9.5 टक्क्यांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे जी 2020 मध्ये ती 6 टक्क्यांपर्यंत घसरली होती. त्याचबरोबर वित्तीय वर्ष 2022 मध्ये दक्षिण आशियाचा जीडीपी (GDP) 6.6 टक्क्यांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
 

आशियाच्या अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करतील
Asia’s economies will perform well

आशियाई विकास बँकेने (ADB) म्हटले आहे की चालू आर्थिक वर्षात विकसनशील आशियाचा आर्थिक विकास दर 7.3 टक्क्यांच्या आसपास असेल. मागील वर्षी हा दर 0.2 टक्के होता. बँकेने म्हटले आहे की कोरोना साथीच्या आजारापासून (corona pandemic) जागतिक पुनर्प्राप्ती आणि कोविड-19 लसीकरण मोहिमेच्या (corona vaccination) जोरदार प्रारंभाचा आशियाई अर्थव्यवस्थांना फायदा होईल. अहवालात म्हटले आहे की 2022 मध्ये या क्षेत्राचा एकूण विकास दर 5.3 टक्के रहाण्याचा अंदाज आहे.
 

सिंगापूरचा आर्थिक विकास दर 7.7 टक्के रहाण्याची शक्यता
Singapore’s economic growth rate is expected to be 7.7 percent

आशियाई विकास बँकेने (ADB) म्हटले आहे की हॉंगकॉंग, चीन, कोरियाच्या औद्योगिक अर्थव्यवस्था वगळता आशिया खंडातील आर्थिक घडामोडी विकसित करणारे सिंगापूर आणि ताइपे-चीनमध्ये यावर्षी यावर्षी 7.7 टक्के दराने वाढ अपेक्षित आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये हा दर 5.6 टक्के होईल. अहवालात पुढे म्हटले आहे की विकसनशील आशियातील बहुतेक अर्थव्यवस्था यावर्षी आणि 2022 मध्ये चांगला विकास करतील. आशियाई विकास बँकेच्या यादीमध्ये विकसनशील आशियामध्ये भौगोलिक गटावर आधारित 46 सदस्य आहेत. यामध्ये नवीन औद्योगिक अर्थव्यवस्था, मध्य आशियातील देश, पूर्व आशिया, दक्षिण आशिया, दक्षिणपूर्व आशिया आणि प्रशांत क्षेत्रातील अर्थव्यवस्था समाविष्ट आहेत.
 
The second wave of covid-19 continues in the country. Meanwhile, the Asian Development Bank (ADB) has given good news about the country’s economy. The Asian Development Bank has said that good and widespread vaccination is underway in the country. As a result, India’s economy is expected to grow at 11 per cent in the current financial year. But the recent surge in covid patients could pose a threat to the country’s economic recovery, the Asian Development Bank said.
PL/KA/PL/30 APR 2021
 

mmc

Related post