संकट काळात उद्योग आणि सरकारमध्ये विश्वास आवश्यक: निर्मला सीतारमण

 संकट काळात उद्योग आणि सरकारमध्ये विश्वास आवश्यक: निर्मला सीतारमण

नवी दिल्ली, दि.21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोव्हिड-19 (covid-19) संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेमुळे प्रभावित झालेल्या उद्योगांशी अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) सातत्याने चर्चा करत आहेत. मंगळवारी त्यांनी सांगितले की, या संकटांच्या काळात शाश्वत वाढीसाठी सरकार आणि उद्योग यांच्यात पूर्ण विश्वास असणे आवश्यक आहे. आम्ही साथीच्या रोगाचा सामना करून अर्थव्यवस्था (economy) वाचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. चेंबर ऑफ कॉमर्सच्या परिषदेत वित्तमंत्र्यांनी सांगितले की साथीची दुसरी लाट आल्यानंतरही केंद्र सरकार अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अनेक पावले उचलत आहे. संकटाच्या वेळी सातत्याने वाढ होण्यासाठी उद्योगांनी एकत्र येणे आवश्यक आहे.

सरकार टाळेबंदीच्या बाजूने नाही
The government is not in favor of the lockdown

सरकार गेल्या वर्षीप्रमाणेच देशभरात सरसकट टाळेबंदी (lockdown) करण्याच्या बाजुने अजिबात नाही याचा सितारमण यांनी पुनरुच्चार केला. साथीचा सामना करण्यासाठी आम्ही लसीकरणाची (corona vaccination) गती आणि व्याप्ती वाढवू. उत्पादन वाढविण्यासाठी कंपन्यांना 4,650 कोटी रुपयांची मदत दिली जात आहेत. सीरम संस्था आणि भारत बायोटेक जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात लस तयार करणार आहेत. सरकारी रूग्णालयात ती मोफत उपलब्ध होईल.

आर्थिक घडामोडी थांबल्यास व्यवसाय आणि नोकर्‍यांचे नुकसान
Loss of business and jobs if economic activities stop

भारतीय किरकोळ संघटनेने (राय) इशारा दिला आहे की स्थानिक पातळीवर आर्थिक घडामोडी बंद केल्यास व्यवसाय व नोकर्‍यांचे कायमचे नुकसान होऊ शकते. रायचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजागोपालन यांनी सांगितले की टाळेबंदीमुळे (lockdown) झालेले नुकसान आम्ही याआधीही पाहिले आहे. पुन्हा असे पाऊल उचलले तर लाखो नोकर्‍या कायम स्वरुपी जातील.
 

निर्बंधाचे परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसू लागले
The effects of the Restrictions on the economy

पतमानांकन संस्था क्रिसिलने दावा केला आहे की राज्यांनी स्थानिक पातळीवर लावलेल्या टाळेबंदीचाही (lockdown) अर्थव्यवस्थेवर (economy) परिणाम दिसू लागला आहे. वाहतूक आणि मालवाहतुकीत घट झाल्यामुळे जीएसटी ई-वे बिले, उर्जा वापर आणि व्यवसायिक घडामोडी लक्षणियरित्या कमी झाल्या आहेत. महाराष्ट्रात 18 एप्रिलपर्यंत वाहतुकीत 17.7 टक्के घट झाली आहे. याशिवाय दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह अन्य राज्यातही वाहतुकीचे दर कमी झाले आहेत. क्रिसिलने आपल्या अहवालात म्हटले आहे की संसर्ग वाढत असताना लसीकरणात (corona vaccination) घट होणे अधिक चिंताजनक आहे. 11 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात, ज्याठिकाणी 10 लाख लोकांपैकी 2,554 लसीकरण करण्यात आले होते, त्याठिकाणी 18 एप्रिलला ही संख्या कमी होऊन 2,408 वर आली आहे.
 

2021-22 च्या विकास दरामध्ये 0.5 टक्के कपात
0.5 percent cut in growth rate for 2021-22

देशांतर्गत पतमानांकन संस्था इक्राने वाढते संक्रमण आणि टाळेबंदीची (lockdown) परिस्थिती लक्षात घेता भारताच्या विकास दराचा अंदाज कमी केला आहे. नवीन आर्थिक निर्बंधांच्या दबावाखाली 2021-22 दरम्यान भारताचा विकास दर 10 ते 10.5 टक्के राहण्याची शक्यता संस्थेने मंगळवारी व्यक्त केली. यापूर्वी संस्थेने 11 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. इक्रा ने सांगितले की एप्रिल ते जून या तिमाहीसाठी आम्ही यापूर्वी 27.5 टक्क्यांच्या विकास दराचा अंदाज वर्तविला होता, परंतू आता तो 20 ते 25 टक्क्यांच्या आसपास राहू शकेल. संसर्गाच्या अलिकडच्या वाढत्या घटनांमुळे ग्राहकांचा आत्मविश्वास कमी झाला आहे. व्यावसायिक आत्मविश्वासही 93 टक्क्यांवरून कमी होऊन 90 टक्क्यांच्या जवळ आला आहे.
Finance Minister Nirmala Sitharaman is in constant touch with the industries affected by the second wave of covid-19 transition. On Tuesday, She said there must be full trust between the government and industry for sustainable growth in these times of crisis. We are trying to save the economy by fighting the pandemic.
PL/KA/PL/21 APR 2021
 

mmc

Related post