निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी सामुहिक

 निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी सामुहिक

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारमधून पदमुक्त करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया दिली असून निवडणुकीतील पराभव ही सामुहिक जबाबदारी आहे. आम्ही तिन्ही पक्षांनी निवडणुकीत एकत्र काम केले होते असे त्यांनी म्हटले आहे.

मतांची टक्केवारी पाहिली तर मुंबईत महायुतीला दोन लाख अधिक मते मिळाली. संविधान बदलणार हे नॅरेटिव्ह म्हणजे विरोधकांनी खोट बोला रेटून बोला या उद्देशाने तात्पुरते नॅरेटिव्ह सेट केले. मोदी हटाव असा नारा विरोधक देत होते. मात्र मतदारांनी या विरोधकांना तडिपार केले असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

मोदीजींकडे विकासाचा अजेंडा आहे. पराभवाची कारण
मिमांसा केली जाईल. गेल्या दोन वर्षात राज्यात अनेक चांगले निर्णय सरकारने घेतले.
या निवडणुकीत जागा कमी झाल्या असल्या तरी मते वाढली आहे. देवेंद्रजी यांनी भावना व्यक्त केल्या असतील तरी मी त्यांच्याशी बोलेन असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

अपयशाने खचून जाणारे आम्ही लोक नाही. जनतेची दिशाभूल करुन मते मिळवण्याचा प्रयत्न केला हे तात्पुरते यश आहे. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जाणारे आहोत. विरोधकांच्या अपप्रचारामुळे जनतेचा संभ्रम दूर कमी करण्यात आम्ही कमी पडलो. मुंबईत महायुतीला दोन लाख अधिक मते मिळाली. मूळ मतदार महायुतीबरोबर असल्याचे दिसून आले असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. Collective responsibility for election defeat

ML/ML/PGB
5 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *