कुरमुर्याचा चिवडा

कुरमुर्याचा चिवडा
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
कुरमुरे (एक मोठे पाकीट), भरपूर / आवडीनुसार लसूण, आवडीनुसार कढिपत्ता, आवडीनुसार/ चवीनुसार/ घरातल्या माणसांच्या वयोगटानुसार हिरव्या तिखट मिरच्या, हळद, मीठ, हिंग, मोहरी.
ऑप्शनल : शेंगदाणे, डाळे, सुकं खोबरं.
क्रमवार पाककृती:
कुरमुरे नीट निवडून, पाखडून घ्या. कढिपत्ता नीट धुऊन सुकवून घ्या. मिरच्या धुवून, सुकवून बारीक कापा. डोळे चोळा …….. यचे असतील तर हात साबणानं धुवून घ्या आणि मग चोळा. लसणाचं म्हणाल तर घालाल तितका थोडाच. लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घ्या किंवा ठेचून घ्या.
एका मोठ्या कढईत कुरमुरे घालून व्यवस्थित भाजून घ्या. अधूनमधून चार कुरमुरे तोंडात टाकून पहात रहा. कुरकुरीत भाजले गेले, थोडा रंग पालटून सावळ्यावर गेले की परातीत पसरून काढा.
मग त्या कढईत २ ते ४ चमचे तेल घाला. त्यात मोहरी, हिंग, हळद, मीठ, लसूण, कढिपत्ता, मिरच्या घालून लसूण चांगला लाल होईपर्यंत परत परत परता. मिरचीच्या खकाण्यानं जीव हैराण झाला तर चिवडा झाल्यावर दुपारच्या चहाच्या वेळी बकाणे भरताना किती मजा येईल याचं स्वप्नरंजन करा. निरुपा रॉय या आद्यखोकलेश्वरीचं स्मरण करत गॅसपाशीच उभे रहा.
लसूण लाल झाला की त्यात भाजलेले कुरमुरे घालून पुन्हा पाच-सात मिनिटे परतत रहा. सर्व कुरमुर्यांना हळद लागली की गंगेत घोडं न्हालं असं समजून पुन्हा परातीत घालून थंड होऊ द्या. मग लगोलग चहा करायला घ्या. गरमागरम चहा आणि झणझणीत, लसणीच्या चवीचा गरमागरम कुरमुर्याचा चिवडा खाल्ला की आत्मा थंड होतो असा स्वानुभव आहे.
उरलाच तर गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा.
Chivda of Kurmurya
ML/ML/PGB
14 July 2024