कॅप्टन कुल माही झाला चित्रपट निर्माता

 कॅप्टन कुल माही झाला चित्रपट निर्माता

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या पंधरावर्षांहून अधिक काळ क्रिकेटचे मैदान गाजवणारा महेद्रसिंग धोनी अर्थांत क्रिकेट चाहत्यांचा लाडका माही आता चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. धोनीचे प्रोडक्शन हाऊस धोनी एंटरटेनमेंटच्या ‘लेट्स गेट मॅरीड’ या पहिल्या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या तमिळ चित्रपटात हरीश कल्याण आणि इवाना मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट जुलै 2023 मध्ये रिलीज होणार आहे.

क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती माही आणि साक्षी संयुक्तपणे करत आहेत. त्याचबरोबर दोघांनी चित्रपटाची स्क्रिप्टही तयार केली आहे. हरीश कल्याण, इवाना, नादिया आणि योगी बाबू हे कलाकार ‘एलएसजी : लेट्स गेट मॅरिड’ या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. रमेश थमिलमणी या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. तसेच या सिनेमातील गाणीदेखील त्यांनीच संगीतबद्ध केली आहेत.

‘एलएसजी : लेट्स गेट मॅरिड’ या सिनेमात इवाना मुख्य भूमिकेत आहे. ‘लव्ह टुडे’ या सिनेमाच्या माध्यमातून इवानाला लोकप्रियता मिळाली होती. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. या सिनेमाचे मोशन पोस्टर अॅनिमेशन स्वरुपात बनवण्यात आले आहे. महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) आपल्या पहिल्या सिनेमाची अत्यंत कमी बजेटमध्ये निर्मिती करणार आहे. हा कॉमेडी ड्रामा चित्रपट असेल. यामध्ये एक कपल आणि आई यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनावर आधारित हा चित्रपट असेल.

महेंद्र सिंह धोनीने धोनी एन्टरटेनमेंट या निर्मिती संस्थेची सुरुवात 25 जानेवारी 2019 रोजी केली आहे. आतापर्यंत या संस्थेअंतर्गत तीन शॉट फिल्मची निर्मिती करण्यात आली आहे. यात ‘रोर ऑफ द लॉइन’, ‘बिलेज टु ग्लोरी’ आणि ‘द हिडन हिंदू’ सारख्या शॉर्ट फिल्मचा समावेश आहे. आता नव्या सिनेमाची धोनीचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
SL/KA/SL
8 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *