बाबरीच्या वेळी लपलेले भाजपचे उंदीर आता बाहेर पडताहेत…

 बाबरीच्या वेळी लपलेले भाजपचे उंदीर आता बाहेर पडताहेत…

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरीच्या बाबत केलेले वक्तव्य गंभीर आहे, जेव्हा बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते अशी टीका उध्दव ठाकरे यांनी केली आहे , मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते .

सध्याचे पंतप्रधान पण त्यावेळी कुठेच नव्हते. तेव्हाचे भरकटलेल्या जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत ठाकरे यांनी ही टीका केली.

भाजपाने तेव्हा बाबरीची जबाबदारी नाकारली त्यावेळी बाळासाहेबांनी ती स्वीकारली. बाळासाहेब म्हणाले हे कसले नपुंसक नेतृत्व. आता एक एक बिळातून बाहेर येतायत. त्यामुळे आमचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असल्याचे ठाकरे म्हणाले.

भाजप कडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळी पण शिवसैनिक रस्त्यावर लढले. एकीकडे भागवत मशिदीत जातात. आता कव्वालीच्या माध्यमातून प्रचार करणार आहे. सत्तेसाठी लाचारी करणारे शिंदे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे. खरे तर मुख्यमंत्र्यांनी देखील राजीनामा द्यावा. त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊ नये. एका मस्तीत चंद्रकांत पाटील बोलतायत असे ही उध्दव ठाकरे यावेळी म्हणाले.

मी जेव्हा अयोध्येला गेलो तेव्हा शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलो होतो. आम्ही कायदा करा म्हणत होतो पण पंतप्रधानांची हिंमत झाली नाही शेवटी निकाल कोर्टाने दिला. शिंदे ना बाळासाहेबांचे आणि शिवसेनेचे पवित्र नाव घेण्याचे अधिकार नाही. त्यांनी बाळासाहेबांचा फोटो पण वापरु नये असे ठाकरे म्हणाले.

ML/KA/SL

11 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *