पंतप्रधानांच्या आव्हानामुळे सोने बाजार आणि कारागीर महासंकटात
मुंबई : अमेरिका- इस्त्रायल विरुद्ध इराण युद्ध सुरू असल्याने सोने आणि चांदीच्या भावात प्रचंड वाढ झाली आहे. या युद्धामुळे सोने एक लाख 50 हजार रुपयेच्या वर तोळा झाले असून, चांदी रुपये किलो झाली आहे. सध्या लग्नसराईचे दिवस असून मोठ्या प्रमाणामध्ये सोने-चांदीच्या दरांमध्ये वाढ झाल्यामुळे लग्नसराईचे बजेट मात्र कोलमडले आहे. तर काहींनी आधीच सोनाराकडे दागिने बनवायला टाकले होते, परंतु या युद्धामुळे भाव प्रचंड वाढल्याने त्यांची आता मोठी पंचाईत झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोने खरेदी करू नका असे आवाहन केल्यामुळे जवेरी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मंदी आली आहे. तर दुकानांमध्ये ग्राहक नसल्याने या झवेरी बाजारांमधील दुकानातील दुकानदार आणि सुवर्णकार उपासमारीच्या विळख्यात अडकायला सुरुवात झाली आहे. यातील अनेक कारागीर आणि सुवर्णकार हे बंगाल आणि कलकत्ता येथील असल्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नामुष्की उडवली असून त्यांचा वाढता कल हा आपल्या गावी जाण्याकडे दिसत आहे.
माझ्या मुलीचे लग्न अगदी पाच दिवसावर आले आहे, परंतु सोन्याचा भाव आज दीड लाख प्रति तोळाच्या वर गेल्याने सोने खरेदी करण्यासाठी फार मोठी अडचण येत आहे. लग्नात सोन्याचे महत्त्व असल्याने त्यासाठी आम्ही इथून
तिथून कर्ज काढून आज सोने खरेदि केले. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोने खरेदी करू नये असे सांगितल्यामुळे आमच्या घरची काही मंडळी सोने खरेदीच्या विरोधात आहे तर काही मंडळी सोने खरेदी करण्यासाठी आग्रही आहे. त्यामुळे आमची देखील मोठी पंचायत झाली आहे.
पण या युद्धामुळे आम्हाल वाढीव दराने सोने खरेदी करावं लागले, याची खंत असल्याची माहिती दिशा मानकामे यांनी दिली.
इराण युद्धामुळे वाढलेल सोन्याचा भाव आणखी वाढून दोन लाख होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वाढलेल्या भावामुठं अनेक व्यापाऱ्यांनी चिंता व्यक् केली आहे. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोने खरेदी करू नका असे आवाहन केल्यामुळे सोन्याची आयात आता कमी झाली आहे. त्यामुळे आठ हजार ते दहा हजार कोटीच्या सोन्याची खरेदी विक्री थांबली. त्यामुळं झवेरी बाजारात सोनेही कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्यानं आणि भाव वाढल्याने विक्रीही हर्व तेवढी होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देश हितासाठी वर्षभर सोने खरेदी करू नका असे आवाहन केल्यामुळे आम्ही लोकांना गरज असेल तर सोने खरेदी करा. सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट साठी सोने खरेदी करू नका असे आवर्जून सांगतो. कारण देशी त्याला पहिले प्राधान्य असून बाकी सगळ्या गोष्टी नंतर करता येतील अशी माहिती झवेरी बाजार व्यापारी असोसिएशनच् अध्यक्ष कुमार जैन यांर्न दिली.KK/ML/MS