सरकारला विचारा, देता की जाता…

 सरकारला विचारा, देता की जाता…

बुलडाणा, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील सरकार हे घोषणाबाज सरकार असून अंमलबजावणी शून्य आहे असा आरोप करत त्यांचे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर आले तर त्यांना विचारा देता की जाता.. असा सवाल आदित्य ठाकरे यांनी आज बुलढाणा येथील शेतकरी संवाद सभेत उपस्थित केला आहे. Ask the government

आदित्य ठाकरे Aditya Thackeray आज विदर्भ दौऱ्यावर आले असता त्यांची शेतकरी संवाद सभा बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे झाली त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली अशा 40 आमदार आणि 12 खासदारांनी राजीनामा द्यावा मी ही माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो आणि यांच्यासोबत निवडणूक लढवतो हिम्मत असेल तर त्यांनी निवडणुकीला सामोरे जावे या गद्दारांना धडा शिकवण्यासाठी सैनिक तयार आहेत असे खुले आव्हान आदित्य ठाकरे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील संवाद सभेत दिले .

बुलडाणा येथील खासदार प्रतापराव जाधव आणि मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय रायमुलकर व बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांना उद्देशून त्यांनी हे आव्हान या सभेमध्ये दिलंय राज्यातील सरकार हे प्रकल्प गुजरात मध्ये नेण्यासाठी सहकार्य करत असल्याचा गंभीर आरोपी त्यांनी यावेळी केला हे सरकार महाराष्ट्रातील युवकांना रोजगारापासून वंचित करत आहे .नोकऱ्या पुढे ढकलत आहे निवडणुका ही पुढे ढकलत आहे केवळ दिवस काढण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केल्या जात आहे असा आरोपही त्यांनी केलाय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे Supriya Sule यांच्या बद्दल कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी जे आक्षेपार्ह विधान केले त्या विधानाचा समाचार घेत सरकारमधील मंत्री असाच महिलांचा अवमान करणार काय ?केंद्र आणि राज्य सरकार हे खपून घेणार का असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

ML/KA/PGB
7 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *