वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिली सत्तारांना समज
मुंबई,दि.७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी असा आदेश दिला होता. राज्यभरातूनही राष्ट्रवादी कॉग्रेसने या विषयावर चांगलीच राळ उठवली आहे.
सत्तार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. सुप्रिया सुळेंच्या टीकेला उत्तर देताना सत्तारांची जीभ घसरली. त्यांनी गलिच्छ भाषेत टीका केली आहे. सत्तारांच्या या टीकेनंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची २४ तासांच्या आत मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अन्यथा सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसनं दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी याबाबतचं एक पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं आहे. यातून त्यांनी हा इशारा दिला आहे.
दरम्यान दिवसभर राज्यभरातून टीका केला जात असताना सत्तार यांनी आता आपल्या वक्तव्याबाबत माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पुढील स्पष्टीकरण दिले आहे.
“मी महिलांचा नेहमीच सन्मान करतो. मी महिलांबाबत एकही शब्द बोललेलो नाही. मी बोलल्यामुळे महिला भगिनींची मनं दुखली असतील तर, मी जरूर खेद व्यक्त करेन. परंतु मी असे काहीही बोललेलो नाही.”
SL/KA/SL
7 Nov. 2022