300 सामाजिक कार्यकर्ते आंदोलनाला बसणार

 300 सामाजिक कार्यकर्ते आंदोलनाला बसणार

मुंबई दि.7( एम एमसी न्यूज नेटवर्क): सर्व सामान्य नागरिकांना भेळसावऱ्या समस्या मार्गी लागून त्यांना न्याय मिळावा यासाठी 300 सामाजिक कार्यकर्ते मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणी मंगळवारी 8 नोव्हेंबर पासून आंदोलन करणार आहे, अशी माहिती समाजिक कार्यकर्ते शैलेश पुणेकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस चे भाव गगनाला भिडले असून सर्व सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे.त्यामुळे पेट्रोल, डिझेल व
सीएनजीवरील टॅक्स कमी करावा, घरगुती गॅस सिलेंडरचे भाव कमी करावेत.

वीजेचे दर ही कमी करून नागरिकांना स्वस्तात वीज कशी मिळेल याचा सरकारने विचार करावा, ज्येष्ठ नागरीकांना पेन्शन तसेच पत्रकारांना पेन्शन मिळावी, नवीन सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन मिळावी आणि जीवनावश्यक वस्तुंवरील जीएसटी हटवावा या मागण्यासाठी 300 सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत . तर मी स्वतः उपोषणाला बसणार आहे अशी माहिती पुणेकर यांनी दिली.

SW/KA/SL

4 Nov 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *