भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात आगमन

 भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात आगमन

नांदेड, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राहुल गांधी Rahul Gandhi यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेने काल रात्री महाराष्ट्रात प्रवेश केला. तेलंगणातील कामारेड्डी येथून आलेल्या या यात्रेचे ही महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे भव्य स्वागत करण्यात आले.

 

हातात मशाल घेतलेल्या हजारो भारत जोडो यात्रीनी तेलांगणातून महाराष्ट्रात प्रवेश केला. यात्रा महाराष्ट्रात येताच तेलांगना काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी महाराष्ट्र्राचे काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कडे तिरंगा सुपूर्द केला. यावेळी राहुल गांधी यांचे महाराष्ट्राच्या संस्कृती प्रमाणे औक्षण करण्यात आले. देगलूर येथे जमलेल्या विशाल जनसमुदायला संबोधित करताना आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषाने केली.

यावेळी बोलताना राहूल गांधी यांनी केंद्र सरकार वर टीका करताना हे सरकार सर्वसामान्यांचे नसून मूठभर भांडवलदारांचे असल्याचे सांगून गॅस, पेट्रोल डिझेल चे भाव गगनाला भिडले मात्र त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी चकार शब्द काढायला तयार नाहीत. चारशे रुपयांचा गॅस एकराशे वर गेला तर पेट्रोल डिझेल ने शंभरी पार केली. महागाई प्रचंड वाढली मात्र सरकार काही चार दोन भांडवलदारांसाठी काम करत आहे आणि फक्त द्वेष पसरविण्याचे काम केले जात आहे असा आरोप केला.

भारत जोडो यात्रेचा उद्देश देश जोडण्याचा आहे. ही पदयात्रा कुणीही रोकू शकत नाही, या पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचे दुःख समजून घेण्यासाठी आलो असल्याचे खासदार राहुल गांधी म्हणाले. यावेळी मध्यप्रदेश चे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंघ, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जयराम रमेश, काँग्रेस चे सरचिटणीस अविनाश पांडे, एच के पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सह महाराष्ट्रातील काँग्रेस चे सर्व दिग्गज नेते सहभागी झाले होते.Bharat Jodo Yatra arrives in Maharashtra

देगलूर येथून राहुल गांधी गुरुद्वारा यादगार साहिबजादे बाबा जोरावरसिंघजी बाबा फत्तेजसिंगजी वण्णाळी कडे निघाले यावेळी जवळपास चार हजार मशालीसह भारतयात्री ही पदयात्रेने वन्नली पर्यंत गेले. दरम्यान आज भारत जोडो यात्रा सकाळी 8.30 वाजता वन्नळी ता.देगलूर येथून सुरू झाली.

ML/KA/PGB
8 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *