पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन, स्वागत

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन, स्वागत

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसाच्या भेटीसाठी मुंबई येथे आगमन झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.

पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो मार्गिका २ अ (दहिसर पूर्व ते डी एन नगर) व मेट्रो मार्गिका ७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) चे उदघाटन करण्यात येणार असून बृहन्मुंबई मनपाच्या २० नवीन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाचे देखील उदघाटन होणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते सांडपाणी प्रक्रिया, रुग्णालय बांधकाम व पुनर्विकास, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास आदी कामांचे भूमिपूजन होणार आहे.Arrival of Prime Minister Narendra Modi, welcome

Prime Minister of India Narendra Modi arrived in Mumbai on a day’s visit. Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari, Chief Minister Eknath Shinde, Dy Chief Minister Devendra Fadnavis welcomed the PM.

ML/KA/PGB
19 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *