नाशिकमध्ये आजपासून अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन

 नाशिकमध्ये आजपासून अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन

नाशिक,दि.२८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आज आणि उद्या( २८ आणि २९ जानेवारी) रोजी नवव्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.  प्रा. फकरुद्दीन बेन्नूर नगरी दादासाहेब  गायकवाड सभागृहात हे संमेलन होत आहे.अब्दुल कादर मुकादम  हे संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवत आहेत. ज्येष्ठ पत्रकार आरफा खानम शेरवानी यांच्या हस्ते आज या संमेलनाचे उद्घाटन सपन्न झाले.

संमेलनासाठी स्वागताध्यक्ष म्हणून शेख इरफान रशीद, कार्याध्यक्ष म्हणून हसन दादामिया मुजावर, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे उपस्थित होते.  उद्घाटन सोहळ्यापूर्वी चित्ररथ काढण्यात आला तसेच पथनाट्य सादरीकरण तसेच पुस्तक प्रकाशन हे उपक्रम झाले.

उद्घाटन सोहळ्यानंतर दुपारी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात मुस्लिमांचे प्रश्न, वास्तव आणि अपेक्षा या विषयावर परिसंवाद होणार आहे. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रा. फ. म. शहजिंदे राहणार आहेत. साहित्य आणि सांस्कृतिक दहशतवाद या विषयावर प्रा. जावेदपाशा कुरेशी यांच्या उपस्थितीत परिसंवाद होणार आहे.

सायंकाळी फातिमाबीच्या लेकींचे कवी संमेलन होणार आहे. यावेळी फरजाना डांगे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. रात्री संमेलन अध्यक्ष अब्दुल कादर मुकादम यांची प्रकट मुलाखत होणार आहे. त्यानंतर बहुभाषिक कवीसंमेलन आणि मुशायरा होणार आहे. मुबारक शेख अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमात २० पेक्षा अधिक शायर, कवी यात सहभागी होणार आहेत.

संमेलनाच्या  उद्या २९ जानेवारी रोजी सकाळी मुस्लिम मराठी साहित्य चळवळीची तीन दशके – साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक अन्वयार्थ या विषयावर डॉ. अजीज नदाफ यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. आम्ही भारताचे लोक या विषयावर डॉ. अलीम वकील यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल.

दुपारच्या सत्रात माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांच्या अध्यक्षतेखाली वर्तमान स्थितीतील मुस्लिम मराठी साहित्यामधील सामाजिक व सांस्कृतिक वेध या विषयावर परिसंवाद होईल. मुकादम यांच्या उपस्थितीत दुपारी चार वाजता संमेलनाचा समारोप होणार आहे.

SL/KA/SL

28 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *