रील्स करताना कार दरीत कोसळून तरुणीचा मृत्यू

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोबाईलवर रील्स करत असताना कारसह दरीत कोसळलेल्या तरुणीचा मृत्यू झाला. खुलताबाद तालुक्यातील शुलिभंजन येथील दत्त मंदिराच्या परिसरात सोमवारी दुपारी ही घटना घडली. श्वेता दीपक सुरवसे (वय २३), असे मृत तरुणीचे नाव असून छत्रपती संभाजीनगर शहरातील हनुमाननगरमधील ती रहिवासी असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.
श्वेता व तिचा मित्र शिवराज संजय मुळे (वय २५) हे दोघे टोयोटो इटिऑस कारने शुलिभंजन येथील दत्त मंदिर परिसरातील निसर्गरम्य वातावरणात रिल्स तयार करण्यासाठी गेले होते. शुलिभंजन दत्त मंदिराजवळील डोंगरावरील मोकळ्या जागेत कार चालवत असतानाचे चित्रीकरण मोबाईल फोनवर सुरू होते.
A young woman died when her car fell into a valley while reeling
ML/ML/PGB
19 Jun 2024