रा.स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना

 रा.स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना

मुंबई दि २०– रा.स्व. संघ हे उच्चवर्णीयांचे संघटन आहे हा हेतूपुरस्सर पसरवलेला गैरसमज आपल्या पुस्तकातून दूर करताना संघ ही सर्वसमावेशक संघटना असल्याची वस्तुस्थिती रमेश पतंगे यांनी आपल्या पुस्तकातून अधोरेखित केली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केले. लेखक व विचारवंत रमेश पतंगे लिखित ‘व्हाय आर वी इन द आरएसएस?…. ‘ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते गुरुवारी (दि. १९) राजभवन मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

पूर्वी संघासाठी कार्य करणाऱ्यांना शासनात पदे स्वीकारता येत नसत, असे सांगून आज देशाचे पंतप्रधान, अनेक राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याचे राज्यपालांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये कुणीही एक दुसऱ्याची जात विचारत नसल्याचे राज्यपालांनी स्वतः पाहिलेले उदाहरण देऊन स्पष्ट केले.

देशात भूकंप, नैसर्गिक आपदा व रेल्वे अपघात होतात त्यावेळी संघाचे स्वयंसेवक नेहमीच सेवा कार्यात अग्रेसर असतात, असे राज्यपालांनी सांगितले. उत्तर पूर्वेच्या राज्यातील लोकांना देशाच्या मुख्य प्रवाहाशी भावनेने जोडण्याचे काम रा.स्व. संघ करीत असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करीत असताना रमेश पतंगे यांचे संघावरील पुस्तक प्रकाशित होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना राज्यपालांनी लेखक पतंगे तसेच अनुवादक डॉ अश्विन रांजणीकर यांचे अभिनंदन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे तसेच ‘आम्ही संघात का आहोत …’ या पतंगे यांच्या मूळ मराठी पुस्तकाचे अनुवादक डॉ. अश्विन रांजणीकर यांनी आपले विचार व्यक्त केले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी तसेच उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे देखील पूर्वी संघ प्रचारक होते. रा स्व संघ आपल्या स्वयंसेवकांना भारत मातेच्या गौरवासाठी काम करण्यास सांगतो, या कारणास्तव आपण आयुष्यभर संघासाठी कार्य केले, असे रमेश पतंगे यांनी सांगितले. पुस्तकाचे भाषांतर सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये होणार असल्याची माहिती पतंगे यांनी यावेळी दिली. रा. स्व. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त ‘साप्ताहिक विवेक’तर्फे प्रकाशित या पुस्तकाला सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांची प्रस्तावना आहे.

Maharashtra Governor releases book ‘Why are we in the RSS…”

Countering what he termed as the false narrative that the RSS is an upper caste organisation, Maharashtra Governor C P Radhakrishnan asserted that RSS has always embodied inclusivity, rooted in the core values of Sanatana Dharma—equality, service, and unity. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *