बेस्ट कामगारांचे प्रश्न सोडवणार
कामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई दि २०
भाजपा बेस्ट कामगार संघाचे सरचिटणीस, भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष गजानन नागे यांनी महाराष्ट्राचे कामगार मंत्री आकाश फुडंकर यांच्यासोबत बेस्ट कामगारांच्या विविध मागण्यांसाठी, बेस्ट कामगारांच्या पुढील येणाऱ्या काळात सुरक्षित भविष्यासाठी नुकतीच मंत्रालयामध्ये त्यांच्या दालनात मीटिंग घेण्यात आली. त्या मीटिंगमध्ये कामगार सचिव कुंदन मॅडम महानगरपालिकेचे सह आयुक्त, कामगार साह्यक आयुक्त सावरकर तसेच बेस्ट प्रशासनाचे सह महाव्यवस्थापक आनंद साखरे आणि इतर बेस्ट अधिकारी तसेच व्हिजिलन्स डिपार्टमेंट , अकाऊंट डिपार्टमेंट , वाहतूक डिपार्टमेंट चें ऑडिटर विभागीय सर्व अधिकारी उपस्थित होते, सर्वांच्या समक्ष चर्चेमध्ये २०१६-२०२१ च्या करारातील एरिअर्स भत्ते अदा करणे,
रिटायर झालेले कामगारांच्या देणी , रखडलेले कोविड भत्त्या बाबत चर्चा होऊन मंत्री महोदयांनी टप्प्या, टप्प्यात लवकर कोविड भत्ता देण्याचे आदेश दिले. तसेच सिनियरिटीने ड्रायव्हर कंडक्टर यांच्या प्रमोशन करण्याबाबत निर्णय झाला, रखडलेला एलटीए विविध विभागात भरती बाबत निर्णय घेतला, २०२१-२०२६ चा करार लवकर करण्यात यावा. बेस्ट उपक्रमातील ३३३७ बस ताफा पुर्ण करण्यात यावा.तसेच बेस्ट अधिकारी यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा देण्यात आला,कामगारा साठी महापालिकेने दिलेला निधी कामगारांचे वेतन व इतर देणी देण्यासाठी वापरला गेला पाहिजे अशी मागणी गजानन नागे यांनी या बैठकीत केली. ती कामगार मंत्र्यांनी मान्य केली.
तसेच आपल्या सर्वांचा महानगरपालिकेमध्ये विलीनीकरणाचा विषय महत्त्वाचा मुद्दा म्हणून उपस्थित करण्यात आला. अशा प्रदीर्घ चर्चा नंतर कामगार मंत्र्यांचे महानगरपालिका प्रशासन तसेच बेस्ट प्रशासन कडून समर्थक उत्तर देण्यात आले. या सगळ्या मागण्या महानगरपालिकेच्या निवडणुकांपूर्वी मागण्या पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले.याबैठकीला कार्याध्यक्ष सिद्धार्थ पडसपगार आनंद जरग, अनिल यादव, संतोष काटकर, मुकेश इंगवले,राजु लिहिणार, महादेव खांडे, विजय मावळे,पुथ्वीराज जाधव, झुंबर जाधव, आबा यादव आगार अध्यक्ष व सचिव युनियन चे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कामगार मंत्री महोदय साहेबांनी बेस्ट कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला याबद्दल बेस्ट उपक्रमात कामगारां कडून अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहे. KK/ML/MS