*छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगात भिनले पाहिजेत

 *छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगात भिनले पाहिजेत

मुंबई, दि. 7 : मी आणि हंबीरराव मोहिते यांची भूमिका ? कसं शक्य आहे ? पण ज्यावेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा वेश परिधान केला तेंव्हा माझ्याकडून महाराजांनीच ही भूमिका साकार करवून घेतली. अमोल कोल्हे आणि प्रतापराव गंगावणे यांनी मला भरपूर प्रोत्साहन दिले, अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त करीत अभिनेते अनिल गवस यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार प्रत्येकाच्या अंगात भिनले पाहिजेत असे सांगितले. मागाठाणे मित्र मंडळ संचालित कै प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय बोरीवली पूर्व येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५२ वा राजाभिषेक सोहोळा साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका समर्थपणे साकार करणारे अभिनेते अनिल गवस हे बोलत होते. हाताशी असलेल्या मोजक्याच मावळ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. एक विचार घेऊन ते पुढे चालले होते त्यांचा तोच विचार छत्रपती संभाजी महाराज यांनी पुढे नेला. मी एक सामान्य माणूस पण उत्तम पाठांतर, शब्द संवाद यांचा योग्य समर्पक वापर करून केलेला अभिनय दिग्दर्शक लेखकांना आवडला हंबीरराव मोहिते यांचे व्यक्तिमत्त्व त्यांचा वेश परिधान करताच आपल्या अंगात भिनला त्यामुळे ही भूमिका आपण साकार करु शकलो. छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकार करणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आणि कथा, पटकथा लेखक प्रतापराव गंगावणे यांनी प्रोत्साहन दिले. सिनेमेटोग्राफर निर्मल जानी यांनी तर एकदम मिठी मारत उचलून घेतले, अशा विविध आठवणी अभिनेते अनिल गवस यांनी सांगितल्या. मालिकेचा संपूर्ण प्रवास अतीशय रोमांचकारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त श्री राजू देसाई यांनीही सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे व्यक्तिमत्त्व साकार करणाऱ्या अनिल गवस यांच्या कार्याची वाखाणणी केली. पराग लिमये यांनी स्लाईड शो च्या माध्यमातून शिवकालीन प्रसंग कथन केले. मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, सचिव वसंत सावंत, कार्याध्यक्ष दिलीप देसाई यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. स्तंभलेखक योगेंद्र ठाकूर, विभाग संघटक शुभदा शिंदे, शिवसेना (उबाठा) चे पदाधिकारी रेखा बोऱ्हाडे, रोहिणी चौगुले, वनिता दळवी, संजय जोजन, सुभाष देसाई, हेमंत पाटकर, शाम साळवी, मनोज सनान्से आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.*

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *