शिवभक्त योगेश केदार यांनी केले रायगडावर अन्नदान

मुंबई, दि 7
आधी शिवभक्तांना जेवण वाढून मगच छत्रपती घराण्याच्या सून असलेल्या यूवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती सामान्य शिवभक्तां सारखे तेथील दगडी शिळेवर बसून जेवल्या!….. त्यांच्या पायाला काही दिवसांपूर्वी दुखापत झाली होती. अन् तश्याही परिस्थितीत त्या दिवसभर गडाच्या कानाकोपऱ्यात पायपीट करत होत्या. जेवायला बसल्यावर त्यांचे पाय आखडणे देखील अवघड झाले होते.
चालण्यासाठी गड तसा सपाट किंवा सोप्पा नाही. आमच्या सारखे तरुण देखील दमून बसत होते, पण त्यांची ऊर्जा काही कमी झाली नाही. मी विचारल्यावर त्या म्हणाल्या, माझ्या हातून अनेक जन्म पुण्य घडले असावे, म्हणून या जन्मी मला छत्रपती घराण्याची सून होण्याचे भाग्य मिळाले असेल. पती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली आपल्या पूर्वजांची सेवा करण्याची हीच संधी आहे, असे त्यांचे म्हणणे आले. मी सुद्धा इतरांच्या प्रमाणे कट्टर शिवभक्त आहे, असेही त्या मला म्हणाल्या. अन् सुद्धा तीच त्यांची मनोमन श्रद्धा देखील आहे असे मला जाणवत होते.
यंदा 5 जून रोजीच रायगडावर प्रचंड मोठी गर्दी उसळली होती. नियोजनात ठरल्याप्रमाणे सर्व गोष्टी व्यवस्थित कार्यरत आहेत की नाही, याचे निरीक्षण त्या करत होत्या. जिथे कमतरता दिसते तिथे योग्य सूचना देत होत्या. मागच्या अनुभवातून बरेच सूक्ष्म नियोजन झाले असल्याचे दिसत होते.
सर्वात महत्त्वाचे, गडावर कचरा दिसू नये म्हणून त्या खूपच आग्रही असतात. त्याकरिता आम्ही यूवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या सोबत किल्लाभर पायी फिरत होतो. तरुण शिवभक्त असो, लहान थोर सर्वांना स्वच्छतेचं महत्त्व राणी साहेब सांगत होत्या. एखाद्याला हक्काने रागवत देखील होत्या. आपल्या महाराजांच्या गडावर कचरा पडूच नये असे शिवभक्त सुद्धा वागत आहेत. ती सवय लावून घेण्यास युवराज्ञी राजेंनी भाग पाडले आहे.
समितीच्या वतीने जागोजागी कचरा टाकण्यासाठी डब्बे ठेवले आहेत. त्याचा परिणाम पूर्वीपेक्षा खूप जास्त स्वच्छता दिसत आहेत. आता अपेक्षेपेक्षा प्रचंड गर्दी होताना दिसतेय, त्यामुळे थोडासा कचरा दिसेलही. परंतु त्याची सुद्धा व्यवस्था सोहळा संपल्यावर केली गेली आहे. शिवभक्तांची एक टीम जमलेला कचरा घेऊनच गड उतरणार आहे.
पर्यावरण दिनाच्या केवळ शुभेछ्या दिल्या नाहीत तर पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत राहिलो याचा आनंद वाटतोय.
मध्येच थांबून भुकेल्या शिवभक्तांना जेवण वाढण्याची सेवा त्यांच्या सोबत मी देखील केली.