भारत-पाकिस्तान तणावामुळे तेजीत खंड

जितेश सावंत
India-Pakistan tensions disrupt market momentum
भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले.
परिणामी, भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण होताना दिसली.९ मे रोजी संपलेल्या आठवड्यात बाजार एक टक्क्यांहून अधिक घसरला. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेली बाजारातील तेजी यामुळे खंडित झाली.
जागतिक सकारात्मक संकेत असूनही भारतीय बाजार घसरला.
अमेरिका-यूके व्यापार चर्चा, अमेरिका-चीन व्यापार वाटाघाटी, युरोपियन सेंट्रल बँकेकडून व्याजदर कपात, परकीय गुंतवणूकदारांची खरेदी(FII), आणि भारत-यूके मुक्त व्यापार करार (FTA) असे सकारात्मक जागतिक संकेत मिळून सुद्धा त्याचा फारसा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला नाही
भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला असून, संरक्षण क्षेत्रासारख्या निवडक क्षेत्रांतच खरेदी केली.
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर रुपयात मोठी घसरण; एका महिन्यातील सर्वात मोठी एकदिवसीय घसरण . भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष तीव्र होत असताना भारतीय रुपयावर (INR) प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. ७ मे रोजी भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर रुपयात १.५ टक्क्यांची घट झाली.८ मे रोजी INR मध्ये एका दिवसात तब्बल ₹१.३० ची घसरण झाली.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा हस्तक्षेप
शुक्रवारी, काही अहवालांनुसार RBI ने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या माध्यमातून हस्तक्षेप केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, जेणेकरून रुपयातील घसरण थांबवता येईल. पुढील काही दिवस हे वातावरण कायम राहिल्यास RBI ला आणखी हस्तक्षेप करावा लागेल.
पुढील आठवड्याचे संकेत. Next week’s cues
येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष मुखत्वे भारत-पाकिस्तान तणावावर असेल. त्याचप्रमाणे अमेरिका-चीन व्यापार चर्चा, (अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे वरिष्ठ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये व्यापार करारावर चर्चा करणार आहेत. ट्रम्प यांनी चीनवरील १२५% टॅरिफ कमी करून ८०% पर्यंत आणण्याची शक्यता व्यक्त केली आहे). (Q3FY25) साठी कंपन्यांचे मार्च तिमाही निकाल,,रुपयाची चाल, अमेरिकन डॉलरची कामगिरी(movement of the US dollar)आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती (international crude oil prices) याकडे असेल.
गुंतवणूकदारानी अत्यंत सावध राहून पुढील पावले उचलावीत.
India-Pakistan tensions weigh on markets and rupee; global cues fail to provide support
Indian equity markets fell over 1% in the week ending May 9, breaking a 3-week winning streak, as geopolitical tensions escalated following India’s strike on terror camps in Pakistan. The Indian rupee posted its worst one-day fall in a month, despite positive global signals like US-UK trade talks, ECB rate cuts, and FII inflows. Investors are expected to remain cautious next week with eyes on geopolitical developments, Q4 earnings, crude oil prices, and dollar movement.
Technical Analysis of Nifty:
Closing on Friday: Nifty closed at 24008.0
KeySupportLevels:23907,23843,23820,23807,23679,23658,23515and23469.Breakingthese could lead Nifty to further lower levels.
ResistanceLevels:,24040,24136.24167,24193,24264,24364,24346,24522,24544,24730,24742,24872,24895,and25223.These resistance levels are crucial for Nifty. If Nifty can break through these levels, it may indicate a continuation of the upward trend, potentially leading to new highs.
लेखक — शेअर बाजार,सायबर कायदा तसेच डेटा प्रोटेक्टशन कायदा तज्ज्ञ आहेत.
The author is an expert in stock market, cyber law, and data protection law.
ईमेल:jiteshsawant33@gmail.com
X(ट्विटर):@JiteshSawant
फेसबुक पेज: Jitesh Sawant
ML/MS