एप्रिल महिन्यात झाले विक्रमी GST संकलन

एप्रिल २०२५ मध्ये वस्तू आणि सेवा कर (GST) मधून सरकारने २.३७ लाख कोटी रुपये जमा केले आहेत. हे आतापर्यंतचे सर्वाधिक जीएसटी संकलन आहे. वार्षिक आधारावर १२.६% वाढ झाली आहे. आज ( १ मे ) जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, एक वर्षापूर्वी म्हणजेच मे २०२४ मध्ये सरकारने १.७३ लाख कोटी रुपयांचा जीएसटी गोळा केला होता.