महिला दिनी ‘नारी शक्तीसह विकसित भारत’ उपक्रम

नवी दिल्ली, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी घोषणा केली की, केंद्र सरकार ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन नारी शक्तीसह विकसित भारत या थीमसह राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून साजरा करेल. ८ मार्च रोजी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत एका परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला आणि बाल विकास मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्व राष्ट्रीय, वांशिक, भाषिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय सीमा ओलांडून महिलांच्या कामगिरीची ओळख पटवण्यासाठी एक जागतिक प्रसंग म्हणून अधोरेखित केले आहे. यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात महटले आहे की, २०२५ वर्ष विशेष महत्वाचे आहे.
हे वर्ष बीजिंग घोषणापत्र आणि कृती मंचाच्या ३० व्या वर्धापन दिनाचे चिन्ह आहे. बीजिंग घोषणापत्र हा एक महत्वाचा दस्तऐवज असून त्यामुळे जगभर जागतिक महिला हक्कांच्या विषयात मोठे परिवर्तन घडवून आणले आहे. या घोषणेमुळे कायदेशीर संरक्षण, सेवांमध्ये प्रवेश, युवकांचा सहभाग आणि कालबाह्य सामाजिक नियम आणि रूढीवादी कल्पना नष्ट करण्यात प्रगती झाली आहे. भारतात, सरकार विविध धोरणे, योजना आणि कायदेविषयक उपाययोजनांद्वारे महिला सक्षमीकरण आणि लिंग समानतेसाठी सक्रियपणे काम करत आहे.
VB/ML/SL
7 March 2025