लाहोरमध्ये श्रीराम पुत्र लव यांच्या समाधीस्थळी पोहोचले BCCI चे उपाध्यक्ष

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दुबईमध्ये 9 मार्च रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात अंतिम सामना होणार आहे. स्पर्धेनिमित्त BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला पाकिस्तानच्या दौऱ्यावर होते. दरम्यान त्यांनी लाहोरमध्ये असलेल्या प्रभू श्रीराम यांचे पुत्र लव यांच्या समाधीस्थळी भेट दिली. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत लाहोरचं नाव लवच्या नावाने पडलं असल्याची महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी फोटोही शेअर केले आहेत.