मंत्र्यांचे खासगी सचिव नेमणे हा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच, फडणवीसांनी ठणकावले

 मंत्र्यांचे खासगी सचिव नेमणे हा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच, फडणवीसांनी ठणकावले

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मंत्र्यांचे खाजगी सचिव आणि त्यांचे सहाय्यक कोण असावेत ते नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असून त्याबाबत कोणालाही शंका असण्याचे काहीही कारण नाही असे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले आहे. काही मंत्र्यांना त्यांना हवे तसे सहाय्यक मिळत नसल्याबद्दलची तक्रार त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली होती त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्र्यांना स्पष्टपणे सांगितले होते की आपल्याला हवा तो अधिकारी आपण खाजगी सचिव अथवा सहाय्यक म्हणून शिफारस करू शकता मात्र त्यातील कोणाला नेमायचे याबाबतचा सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांचा राहील असेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. अनेक खाजगी सचिव आणि सहाय्यक यांची प्रतिमा मंत्रालयातील फिक्सर म्हणून झालेली आहे ही प्रतिमा सरकारची म्हणून मानली जाते त्यामुळेच हा अधिकार आपण कठोरपणे वापरणार असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

डिसेंबरमध्ये राज्याचे नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर फेब्रुवारी महिना संपत आला तरी अनेक मंत्र्यांचे खाजगी सचिव आणि सहाय्यक यांच्या नेमणुका झालेल्या नाहीत, त्यामुळे काम करायला त्रास होतो अशी तक्रार काही मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केली होती. मात्र ज्या नावांच्या शिफारसी आपल्यासमोर आलेल्या आहेत त्यातील कोणाच्या चौकशा सुरू आहेत, कोणाबद्दल नेमक्या काय तक्रारी आहेत याची खातर जमा केल्याशिवाय आपण कोणालाही मंजुरी देणार नाही असेही फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांसमोर आज पुन्हा एकदा ठणकावून सांगितले.

ML/ML/SL

24 Feb. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *