मुंबईत लवकरच सुरू होणार बाईक टॅक्सी

 मुंबईत लवकरच सुरू होणार बाईक टॅक्सी

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईमध्ये रस्ते, उड्डाणपूल, कोस्टल रोड उभारण्यात येत असले तरीही रस्त्यांवरील मोठ्या वाहनांमुळे प्रवाशांना प्रवासासाठी खूप जास्त वेळ खर्च होतो. येत्या दोन महिन्यांत मुंबईत बाईक टॅक्सी सुरु होणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. बाईक टॅक्सी सुरु करण्याच्याअनुषंगाने परवाने दिले जाणार आहेत.

मुंबईत दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहेत. यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या वाहतुकीची साधने अपुरी पडत आहेत. त्यामुळे ठिकाणी वाहतुकीचे पर्याय आणि सोयी कमी आहेत किंवा वाहतूककोंडी होते अशा ठिकाणी बाइक टॅक्सीला परवानगी देण्यात यावी, अशी सूचना झा समितीच्या अहवालात करण्यात आली होती. मात्र राज्य सरकारने ग्रामीण भागासह शहरी भागातही बाइक टॅक्सी चालविण्यास मंजुरी दिली होती. मुंबईत बाईक टॅक्सी सुरु करण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरु झाल्या आहेत.

पुढच्या दोन महिन्यात रॅपिडो सारख्या बाईक सर्विस मुंबईत सुरु होणार आहेत. बाईक टॅक्सी सुरु करतांना महिला सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. बाईक चालकाला मागे प्रवासी बसवतांना बाईकच्या मधोमध पार्टीशन लावणे बंधनकारक असेल अशी अट ठेवली जाणार आहे. ओला, उबेर प्रमाणेच मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

SL/ML/SL

29 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *