शेअर बाजारात अस्थिरतेचे वारे;बाजार अर्थसंकल्पाच्या प्रतीक्षेत

मुंबई, दि. 25 (जितेश सावंत) :भारतीय शेअर बाजार सध्या अस्थिरतेच्या छायेखाली असून, गुंतवणूकदारांचे लक्ष २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे आहे. या अस्थिरतेत गुंतवणूकदारांनी कोणती रणनीती अवलंबावी, यावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे ठरणार आहे
आठवड्याच्या सकारात्मक सुरुवातीनंतरही शेवटच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजार लाल निशाणावर बंद झाले. २० जानेवारी ते २४ जानेवारी या आठवड्यात तीन सत्रांमध्ये वाढ होऊनही प्रमुख बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी, अर्ध्या टक्क्यांपेक्षा अधिक घसरले.
या आठवड्यात खालील बाबींमुळे बाजारावर दबाव राहिला –
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची उच्च व्यापार शुल्क (टॅरिफ) लावण्याची घोषणा:
ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच शेजारी देशांवर व्यापार शुल्क लावण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात अस्थिरता निर्माण झाली.(सोमवारी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी सांगितले की, त्यांचे प्रशासन १ फेब्रुवारीपासून मेक्सिको आणि कॅनडावर २५% टॅरिफ लावण्याचा विचार करत आहे.)
एनर्जी स्टॉक्समध्ये मोठी घसरण:
ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे बाजाराच्या रिकव्हरीवर मर्यादा आल्या आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी झाला.
परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FIIs) विक्री:
परकीय गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा कायम असून, २३ जानेवारी रोजी त्यांनी भारतीय बाजारातून तब्बल ५,४६२ कोटी रुपयांची इक्विटी विकली, ज्याचा बाजारावर मोठा परिणाम झाला.(२०२५ मध्ये आत्तापर्यंत परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FIIs) भारतीय शेअर बाजारातून ६ अब्ज डॉलर्सहून अधिक इक्विटी विक्री केली आहे)
देशी कंपन्यांचे अपेक्षेपेक्षा कमी तिमाही निकाल:
डिसेंबर तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा कमी आल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास ढासळला आणि त्यामुळे सेन्सेक्स तथा निफ्टी सलग तिसऱ्या आठवड्यात घसरणीसह बंद झाले.(कंपन्यांच्या व्यवस्थापनाने दिलेली उदासीन मते बाजाराच्या भावनांवर अधिक नकारात्मक परिणाम करत आहेत.)
यामुळे बाजारावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे .बाजारात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता जाणवत आहे.बाजाराचे संपूर्ण लक्ष शनिवारी, 1 फेब्रुवारी 2025 रोजी 2025-26 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्पावर असून गुंतवणूकदारांच्या तसेच भारतातील सर्व स्तरावरील लोकांच्या अपेक्षा देखील वाढल्या आहेत.
बाजार त्या दिवशी नेहमीप्रमाणचे उघडे राहतील.
भारतीय बाजार पुढील काही दिवस अस्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध राहणे गरजेचे आहे. त्याचबरोबर, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी बाजारातील घसरणीचा लाभ घेत, मजबूत कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी साधावी.
Indian stock markets ended lower despite a positive start, with Sensex and Nifty falling over 0.5% during the week. Key market factors include Trump’s trade tariff announcement, a decline in energy stocks, continued FII sell-offs, and weaker-than-expected Q3 earnings. Investors are advised to stay cautious and utilise dips for long-term investments.
The market now awaits the Union Budget on February 1 for further direction.
Technical Analysis of Nifty:
Closing on Friday: Nifty closed at 23092.2
KeySupportLevels:- 22979.03, 22865.87 and 22681.73 Breaking these could lead Nifty to further lower levels.
Resistance Levels: 23163.17,23276.33,23460.47 and 23573.63.
These resistance levels are crucial for Nifty. If Nifty can break through these levels, it may indicate a continuation of the upward trend, potentially leading to new highs.
लेखक — शेअर बाजार,सायबर कायदा तसेच डेटा प्रोटेक्टशन कायदा तज्ज्ञ आहेत.
The author is an expert in stock market, cyber law, and data protection law.
ईमेल:jiteshsawant33@gmail.com
X(ट्विटर):@JiteshSawant
फेसबुक पेज: Jitesh Sawant
ML/ML/PGB 25 Jan 2025