छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांच्या जोरदार हल्ल्यात ९ जवान शहीद

छत्तीसगढमधील बीजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. सुरक्षा दलाच्या वाहनाला आयईडीने लक्ष्य करण्यात आले आहे. यात ९ जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सोमवारी ६ जानेवारीला दुपारी २.१५ वाजता कुटरू भागात ही घटना घडली. यात 6 पेक्षा अधिक जवान गंभीर जखमी झाले आहेत. बस्तरच्या महानिरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, बीजापूरमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात दंतेवाडातील ९ जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात जवानांना घेऊन निघालेल्या वाहनाच्या ड्रायव्हरचाही मृत्यू झाला आहे. हे सर्व जवान दंतेवाडा, नारायणपूर आणि बीजापूरमध्ये संयुक्त कारवाई करून परतत होते.