कशेडी घाटातील बोगद्यातून वाहतूक बंद

 कशेडी घाटातील बोगद्यातून वाहतूक बंद

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई – गोवा महामार्गावर कशेडी घाटाला पर्याय म्हणून कशेडी बोगद्याची निर्मिती केली आहे. त्यामुळे पोलादपूर ते खेड हे अंतर अवघ्या २० मिनिटांत पूर्ण करणे शक्य झाले आहे. परंतु बोगद्यातून वाहतूक सुरू केल्यानंतर अनेक वेळा काही कारणास्तव हा बोगदा नेहमीच बंद करण्यात येतो. त्यामुळे वाहन चालकांना कशेडी घाटाचा पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागतो. आता गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक कशेडी घाट मार्गे वळविण्यात आली आहे.

कशेडी बोगद्याकडे जाणाऱ्या पुलाच्या गर्डर शिफ्टिंगचे काम सुरू असून हे काम करत असताना येणाऱ्या – जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण होऊ नये यामुळे बोगद्यातून जाणारी वाहतूक पंधरा दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.

SL/ML/SL

25 Nov. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *