बदलापुर येथील घटनेच्या निषेधार्थ २४ ऑगस्टला महाविकासा आघाडीचा महाराष्ट्र बंद

 बदलापुर येथील घटनेच्या निषेधार्थ २४ ऑगस्टला महाविकासा आघाडीचा महाराष्ट्र बंद

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बदलापूरमध्ये दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने नागरिक चांगलेच संतापले आहेत. आठवड्याभरानंतर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बदलापूरमधील नागरिकांनी सोमवारी मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला. या घटनेविषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आंदोलन राजकारणाने प्रेरित होते असं म्हटलं आहे. या घटनेच्या निषेधार्थ आता येत्या २४ तारखेला महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची घोषणा दिली आहे. बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

TR/ML/PGB
21 Aug 2024

incognito@trimitiy.com

http://mmcnewsnetwork.com

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *