कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान आणि यावर्षी वाढीव दर देखील

 कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान आणि यावर्षी वाढीव दर देखील

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान आणि यावर्षी वाढीव दर देखील

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत सरकार प्रती हेक्टरी पाच हजार इतकी मदत देईल अशी घोषणा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत केली. तसेच यावर्षी लांब धाग्याच्या कापसाची सरकारी खरेदी ७, ५२१ रुपये या केंद्र सरकारच्या नवीन दराने खरेदी केली जाईल अशीही घोषणा त्यांनी यावेळी केली. याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते, हरीश पिंपळे यांनी तो उपस्थित केला होता.

केंद्राच्या खरेदी दरापेक्षा बाजारात जास्त दर मिळतो, गेल्या वर्षी केंद्राने बारा लाख क्विंटल कापूस खरेदी केली. खासगी खरेदी तीन लाख सोळा हजार क्विंटल इतकी झाली. ई पीक नोंदणी नसल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे हे लक्षात घेऊन ग्रामसेवक , तलाठी आदींची समिती नेमून नोंदणी वाढविण्यात येईल असं मंत्री म्हणाले. यावर नारायण कुचे , प्रकाश सोळंके , यशोमती ठाकूर, हरिभाऊ बागडे , राजेश एकडे आदींनी उप प्रश्न विचारले.

कात्रज पुलाचे भूसंपादन लवकरच पूर्ण

पुण्यातील कात्रज येथील चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन जानेवारी २०२५ पर्यंत ते काम पूर्ण करण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या प्रश्नाच्या उत्तरात दिली, भीमराव तापकीर यांनी तो उपस्थित केला होता.

२०१९ साली भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, आता १३९ कोटी रुपये यासाठी प्राप्त झाले आहेत त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल याशिवाय सध्या होणारी वाहतूक कोंडी अधिकचे वॉर्डन नेमून दूर केली जाईल अशी ग्वाही मंत्री चव्हाण यांनी दिली. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान आणि यावर्षी वाढीव दर देखीलSubsidy to cotton farmers and also increased rates this year

ML/ML/PGB
3 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *