हलका फुलका झटपट नाश्ता

 हलका फुलका झटपट नाश्ता

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लागणारे जिन्नस: 

4 वाटी चुरमुरे,
2 कांदे बारीक चिरून,
2 हिरव्या मिरच्या तुकडे करून,
कडीपत्ता पाने 7,8
ओले.खोबरे अर्धी वाटी
कोथिंबीर लिंबू साखर चवीनुसार
अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे,
तेल, मीठ,हळद,जिरे ,हिंग हे फोडणीचे साहित्य
.. बारीक शेव / फरसाण / लसूण शेव हवे असल्यास ..ऑप्शनल आहेत..

क्रमवार पाककृती: 

  1. चुरमुरे पाण्यात घालून , 1 मिनिटभर भिजवून ,चाळणीवर ओतून ठेवावे..
    नेहमीप्रमाणे फोडणीसाठी तेल घेऊन त्यात जिरे मोहरी हिंग हळद मिरची कांदा घालावे…परतून घ्यावे…
  2. त्यातच शेंगदाणे घालावे आणि कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यावे..
  3. त्यावर चुरमुरे टाकावे..चांगली 3 ते 4 मिनिट वाफ काढावी..
  4. गॅस बंद करून , कोथिंबीर लिंबू खोबरे घालून गरम सर्व्ह करावे..
  5. हवी असल्यास शेव फरसाण घालू शकता…

ML/ML/PGB
18 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *