फक्त १२ दिवसात ‘ही’ महिला धावली तब्बल १००० किमी

 फक्त १२ दिवसात ‘ही’ महिला धावली तब्बल १००० किमी

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अवघ्या १२ दिवसांत तब्बल १ हजार किमी धावून नवा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या नताली डाऊला आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रमाणपत्राचे वेध लागले आहेत. थायलंड, मलेशिया आणि सिंगापूर असा मोठा प्रवास नताली डाऊने केवळ १२ दिवसांत पूर्ण केला आहे. या काळात तिला अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागले. कडक उन्हाचा सामना करताना डाऊचे शूजही वितळले होते.

५२ वर्षीय डाऊ हीचा हा ऐतिहासिक प्रवास ५ जून रोजी सिंगापूरमध्ये संपला. बीबीसीशी बोलताना नताली डाऊ म्हणाली, ‘चार दिवसांत आज पहिल्यांदाच मी हे काम पूर्ण केले आहे का ? असा प्रश्न मलाच पडला आहे. मला क्रीडा क्षेत्राशी निगडीत आव्हाने आवडतात, परंतु कधीकधी उद्भवणाऱ्या समस्यांमुळे माझ्या या कामात अनेक अडथळे मला पार करावे लागले.

ML/ML/PGB
18 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *