बंदरात होडी उलटली, चार खलाशी बेपत्ता, शोधकार्य सुरू

 बंदरात होडी उलटली, चार खलाशी बेपत्ता, शोधकार्य सुरू

सिंधुदुर्ग, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात वेंगुर्ला बंदर येथून एका छोट्या होडीत माशांसाठी लागणारा बर्फ आणि अन्य साहित्य घेऊन सात खलाशी मोठ्या लॉन्चवर जाण्यासाठी काल रात्री निघाले होते. मात्र रात्रीच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यामुळे होडी भरकटली आणि समुद्राच्या पाण्यात उलटली.

यावेळी होडीवर असलेले सात खलाशी साहित्यासह समुद्राच्या पाण्यात पडले. त्यातील तीन खलाशी हे जीवाची परवा न करता पोहून किनाऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. मात्र चार खलाशी अद्याप पर्यंत सापडलेले नाहीत. ते पाण्यात बेपत्ता झाले आहेत. त्या चार खलाशांमध्ये एक खलाशी रत्नागिरी येथील तर तीन खलाशी हे मध्य प्रदेश येथील असल्याचे समोर येत आहे. रात्री वादळी वाऱ्याबरोबरच वीज खंडित झाल्याने सर्वत्र अंधार पसरला होता.अंधाऱ्या रात्री मध्ये ही दुर्घटना घडली आहे. तात्काळ अन्य होड्यांमधून त्या खलाशांना वाचविण्यासाठी शोध कार्य सुरू झाले. मात्र रात्री बारा वाजेपर्यंत त्यांचा कुठेही ठाव ठिकाणा लागला नाही. आज सकाळी पुन्हा एकदा शोधकार्य सुरू करण्यात आले आहे. वेंगुर्ला बंदरात अद्याप शोधकार्य सुरू असून बुडालेली होडी बाहेर काढण्यात यश मिळाले आहे . एका खलाशाचा मृतदेह सापडला. तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टर द्वारा शोधकार्य सुरू आहे.

ML/ML/SL

24 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *