एफडीए’कडून त्या मसाल्याच्या पदार्थांची तपासणी होणार!

‘
मुंबई, दि.2(एमएमसी न्यूज नेटवर्क) :भारतीय मसाल्याच्या प्रसिद्ध कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये कर्करोगासाठी पोषक असलेले एथिलीन ऑक्साईड हे घटक सापडल्याने हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. या धर्तीवर राज्यात विक्री होणाऱ्या या नामांकित कंपन्यांच्या मसाल्यांची तपासणी करण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे.अशी माहिती
अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शैलेश आढाव यांनी दिली.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या निर्देशा नुसार
राज्यातील नागरिकांना चांगले खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून नेहमीच विविध खाद्यपदार्थांची तपासणी केली जाते. नुकतेच हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये भारतीय प्रतिष्ठित कंपन्यांच्या मसाल्यांमध्ये कर्करोगासाठी पोषक असलेला एथिलीन ऑक्साइड हा घातक पदार्थ सापडला. त्यामुळे राज्यात विक्री होणाऱ्या या प्रतिष्ठित कंपन्यांचे मसाल्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या घाऊक, किरकोळ विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेल्या मसाल्याच्या पदार्थांची नमुने घेऊन त्याची तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये सदोष आढळणाऱ्या उत्पादनाच्या कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
या कंपन्यांच्या मसाल्यांच्या उत्पादनाबरोबरच त्यांच्या अन्य पदार्थांचीही तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शैलेश आढाव यांनी दिली.
ML/ML/PGB 2 May 2024