वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी टँकरनं पाणी

 वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी टँकरनं पाणी

वाशीम, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्यातील वन कर्मचारी आणि निसर्ग प्रेमींनी एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे.
जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढु लागल्याने जंगल परिसरातील नदी, नाल्यासह नैसर्गिक जलस्त्रोतातील पाणी आटत चालले आहे. काही भागात वन्यप्राण्यांना पाणी मिळत नसल्यानं वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा आता गावखेड्याकडे वळविला आहे.

वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकंती करीत असतांना बऱ्याचदा त्यांचा जीव धोक्यात येत असल्यानं वाशीम जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्याच्या शेजारी असलेल्या वनोजा येथील वनपरिक्षेत्रांतील प्रादेशिक जंगलात वनविभागाच्या मार्गदर्शनात लोकवर्गणीतून तयार करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्यात वनविभागाकडून वेळोवेळी टँकरनं पाणी भरून वन्यजीवांची तहान भागविली जात आहे.

ML/ML/PGB 2 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *