कारंजा, मानोरा या तालुक्यात पावसाचा हाहाकार!
वाशिम, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मागील २४ तासांपासून वाशिम जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत असून याचा फटका जिल्ह्यातील मानोरा व कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. मुसळधार पावसामुळे बेंबळा, अरुणावती, खोराडी आदी नद्या दुथडी भरून वाहत असून नदीच्या पुराचे पाणी परिसरातील शेतात व गावात घुसले आहे. Karanja, Manora taluka rain disaster!
नदी नाल्यांना महापूर आल्याने जिल्ह्यातील शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान भारतीय हवामान विभाग,नागपूर यांनी आज जिल्हासाठी ऑरेंज अलर्ट तसेच २३ ते २५ जूलैपर्यंत येलो अलर्ट दर्शविण्यात आला आहे. जिल्हयात पावसाची संततधार सुरू असल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
पावसाचा अंदाज घेऊनच लोकांनी कामकाजाचे नियोजन करावे.
नदी-नाल्यांना पूर आल्यास त्याठिकाणी नागरीक,
महिला व लहान मुलांनी पुलावरुन रस्ता ओलांडू नये. नागरीकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी नदी-नाल्यांचे ठिकाणी जाण्याचे टाळावे. कोणीही मासेमारी करण्यास तलाव,धरण किंवा नदयामध्ये जाऊ नये. पुराच्या ठिकाणी सेल्फी काढू नये. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
ML/KA/PGB
22 July 2023