वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा

 वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा

बीड, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील रामपुरी -श्रीपतअंतरवाला – गोपत पिंपळगावासह अन्य गावांत काल वादळी वाऱ्यासह गारपिट झाली, यात नागरिकांच्या घरावरील पत्रे उडाले तर शेतीचे नुकसान झाले आहे.

बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यामध्ये काल सायंकाळच्या दरम्यान जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला तर काही ठिकाणी गारांचा देखील पाऊस पडला. दरम्यान वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रा उडून लागल्याने महिला गंभीर जखमी झाल्याची घटना राजापूर येथे घडली आहे. जखमी महिलेवर बीड येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ML/KA/PGB
26 Apr 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *