आयोध्येसाठी शिवसैनिक रवाना

 आयोध्येसाठी शिवसैनिक रवाना

ठाणे, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): येत्या रविवारी अयोध्या दौरा करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर आज ठाण्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने एका विशेष रेल्वे गाडीने आयोध्येकडे रवाना झाले.एकत्रित शिवसेनेत असताना अनेक नेते , आमदार आणि खासदार यांना उध्दव ठाकरे यांनी त्यावेळच्या आयोध्या दौऱ्यात नाकारले होते, याची पार्श्वभूमी या दौऱ्याला आहे.

आज रवाना झालेल्या शेकडो शिवसैनिकांना नीरोप देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे ठाणे रेल्वे स्थानकात उपस्थित होते, त्यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

यावेळी जय श्रीराम च्या जोरदार घोषणा शिवसैनिकांनी केल्या. नाशिक आणि राज्यातून अन्य ठिकाणाहूनही असंख्य शिवसैनिक , पदाधिकारी आज आयोध्येकडे रवाना झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदार , खासदारांसह उद्या अयोध्येला जात असून तिथे रविवारी सकाळी प्रभू रामाच्या मंदिरात दर्शन घेतले जाईल , सायंकाळी शरयू नदी तीरावर आरतीमध्ये ते सहभागी होतील आणि रात्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेवून शिंदे मुंबईला परतणार आहेत.

ML/KA/PGB
7 Apr. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *