जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लोटली गर्दी
बुलडाणा, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची आज 425 वी जयंती , बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात जिजामातेचा जन्म झाला होता. दरवर्षी 12 जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी साजरा केला जातो.A crowd flocked to bow down at the feet of Jijau
त्यानिमित्त राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई आणि राष्ट्रमाता जिजाऊंच जन्मस्थळ आकर्षक अशा पुष्पहारांनी सजवण्यात आला आहे. महिला आणि पुरुष यांनी भगवे फेटे परिधान करून तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देत सकाळपासूनच जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी गर्दी केलीआहे …
सकाळीच राजे लखोजी जाधव यांचे वंशज यांनी राजमाता जिजाऊची आरती केली आणि जिजाऊ वंदन केले, त्यानंतर राजवाडा परिसरामध्ये फटाक्याची आतिश बाजी करत जन्मोत्सव सोहळा साजरा केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सकाळीच संपत्ती घेऊन राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन केले.
ML/KA/PGB
12 Jan. 2023