उत्तर भारत गारठला,ऑरेंज अलर्ट जारी

 उत्तर भारत गारठला,ऑरेंज अलर्ट जारी

नवी दिल्ली, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. हवामान खात्याने पुढील ४८ तासांसाठी देशातील अनेक भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थान, बिहारमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

दिल्लीच्या सफदरजंग  भागात आज सकाळी किमान तापमान 3.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. IMD च्या अंदाजानुसार, किमान तापमान ४ अंशांवर स्थिरावण्याची अपेक्षा आहे, तर कमाल तापमान १९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

जेव्हा किमान तापमान ४ अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी होते आणि/किंवा सामान्यपेक्षा ४.५ अंश कमी होते तेव्हा IMD ‘शीत लहर’ घोषित करते. जेव्हा किमान तापमान 10 अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी असते आणि/किंवा सलग दोन दिवस हंगामाच्या सामान्य तापमानापेक्षा 4.5 ते 6.4 अंश कमी असते तेव्हा ‘थंड दिवस’ घोषित केला जातो.

 

SL/KA/SL

10 Jan. 2023

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *