म्हैसाळ उपसा सिंचन योजना आता सौरउर्जेवर

 म्हैसाळ उपसा सिंचन योजना आता सौरउर्जेवर

सांगली, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सांगली जिल्हयातील म्हैसाळ Mhaisal in Sangli district उपसा सिंचन योजना ही सौरउर्जेवर कार्यान्वित होणार आहे. जर्मनीच्या KFW बॅंकेचे कर्ज आणि त्या कर्जाच्या हमीस भारत सरकारने मंजुरी दिली आहे.

या योजनेची वीज बिले भरण्यासाठी शेतकऱ्यांवर पडणारा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सौर उर्जा प्रकल्प राबविण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळावी अशी मागणी जिल्ह्याचे खासदार संजय पाटील यांनी केली होती.

याअनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनी दौऱ्या दरम्यान याबाबत त्रिराष्ट्रीय करार केला होता. याबाबत जर्मनीच्या KFW बॅंक यांनी प्रतिसाद देत कर्ज देण्यास आणि भारत सरकारने या कर्जाची हमी देण्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी दिली आहे.

या प्रकल्पाला कार्यान्वित करणेसाठी महाराष्ट्र शासनाने १८ डिसेंबर २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विशेष प्रोत्साहन आणि मान्यता दिली.

मंतत्रिमंडळाच्या निर्णयानुसार जर्मनीच्या KFW बॅंकेसमवेत करारनामा करणेसाठी जर्मन KFW बॅंकेच्या वतीने संचालक कुरोलीन गेसनर व क्लॉडिया स्केमलर तसेच राज्य शासनाच्या वतीने वित्त विभागाचे उपसचिव वाघ, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांनी स्वाक्षऱ्या करुन करारनामा स्वाक्षांकीत केला. यावेळी खासदार संजय पाटील ही उपस्थित होते .

या प्रकल्पाद्वारे निर्माण होणारी २०० मेगाव्हॅट सौर उर्जा ही उपसा सिंचन योजनेसाठी वापरली जाणार आहे. त्याकरिता १४४० कोटी इतका खर्च येईल. या प्रकल्पाकरिता जत तालुक्यातील संख येथील सरकारी जमीन निश्चित करण्यात आलेली आहे.

प्राथमिक प्रकल्प अहवाल (PPR) नुसार या प्रकल्पाची किंमत एकूण १४०० कोटी इतकी आहे. त्यापैकी KFW या वित्तीय संस्थेकडून रु. १९१२० कोटी (८०%) कर्ज घेण्याचे प्रस्तावित असून, राज्य शासनाचा हिस्सा रु. २८० कोटी (२०%) इतका असणार आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने एक वर्षासाठी कार्यान्वित करणे करिता ३९८ द. ल. युनिट इतका वीज वापर अपेक्षित आहे.Maisal Upsa Irrigation Scheme now on solar power

ML/KA/PGB
10 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *